पोलीस भरतीसाठी दोन मुलांची भन्नाट शक्कल... पण...

परीक्षेत पास होण्यासाठी अभ्यास सोडून तरूणाई वेगळ्याच मार्गाला लागली असल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. त्यातच आता पोलीस भरतीमध्ये यश मिळवण्यासाठी औरंगाबादच्या दोन मुलांनी भन्नाट शक्कल लढवली.. त्यात ते यशस्वी सुद्धा झाले मात्र संशय आला आणि बट्ट्याबोळ झाला... पाहूयात काय आहे हा प्रकार...

Updated: May 19, 2017, 09:43 PM IST
पोलीस भरतीसाठी दोन मुलांची भन्नाट शक्कल... पण... title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : परीक्षेत पास होण्यासाठी अभ्यास सोडून तरूणाई वेगळ्याच मार्गाला लागली असल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. त्यातच आता पोलीस भरतीमध्ये यश मिळवण्यासाठी औरंगाबादच्या दोन मुलांनी भन्नाट शक्कल लढवली.. त्यात ते यशस्वी सुद्धा झाले मात्र संशय आला आणि बट्ट्याबोळ झाला... पाहूयात काय आहे हा प्रकार...
 
 पोलिसांत भरती होण्यासाठी औरंगाबादच्या दोन तरुणांनी भन्नाट शक्कल लढवलीय. त्यांच्या याच कल्पनेमुळे ते फक्त पास झाले नाहीत तर परीक्षेत अव्वलही आले. औरंगाबादच्या तेजराव साबळे आणि भारत राजेंद्र यांनी ठाण्यात होत असलेल्या पोलीस भरतीसाठी अर्ज केला. 
 
 
 लेखी आणि शारिरीक अशा दोन प्रकारात ही परीक्षा होणार होती. त्यात लेखी परीक्षेत पास होण्यासाठी या दोघांनी एमपीएससीचा अभ्यास करणा-या दोन विद्यार्थ्यांना साडेचार लाख रुपयांची ऑफर दिली. त्यांनी परीक्षेच्या आयकार्डवर लिलया फोटो बदलले आणि पोलीस भरतीचा पेपर सहज पार करीत  अव्वल मार्क मिळवले. त्यानंतर शारिरीक तंदुरूस्ती परीक्षेसाठी पुन्हा दोन नवीन उमेदवारांचा शोध घेतला आणि प्रत्येकी 2 लाख रुपये देत त्याही परीक्षेत अव्वल मार्क मिळवले. अशा पद्धतीनं कुठलीही परीक्षा न देता या मुलांनी पोलीस भरतीची परीक्षा मेरिट गुणांनी पास केली, मात्र त्यांच्याच  एका मित्रानं याची माहिती पोलिसांना दिली आणि सगळा प्रकार उघड झाला...