औरंगाबाद : महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मालमत्ता वसुलीसाठी हॉटेल चालकांवर थेट बंदूक रोखल्याचा प्रकार औरंगाबादेत घडलाय.
सिडकोमध्ये हरिषचंद्र पवार यांचं प्लॅटिनम इन नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी येऊन मालमत्ता कर भरला नाही म्हणून हॉटेल सील करीत होते. त्यावेळी महापालिकेचे अधिकारी ढाके आणि हरिषचंद्र पवार यांच्यात शाब्दिक वाद सुरु असताना अधिकाऱ्यांनी थेट बंदूक रोखली.
त्यानंतर त्याठिकाणी असलेली लोकं दोघांमध्ये आल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी हॉटेल चालक हरीशचंद्र पावरांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून बंदूक रोखून जीवे मारल्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केलाय. मात्र, मालमत्ता वसुलीसाठी अशा पद्धतीने अधिकाऱ्यांना बंदूक रोखण्याचा अधिकार आहे का असा प्रश्न विचारला जातोय.