आसनगावजवळ रेल्वेच्या धडकेत ४ महिला ठार

आसनगावजवळ उद्यान एक्स्प्रेसने ४ महिलांना चिरडलंय, आसनगाव रेल्वे स्थानकादरम्यान गोदान एक्सप्रेसने या महिलांना उडवलं, या अपघातात चारही महिलांचा जागीच मृत्यू झालाय.

Updated: Jan 20, 2015, 05:33 PM IST
आसनगावजवळ रेल्वेच्या धडकेत ४ महिला ठार title=

ठाणे : आसनगावजवळ उद्यान एक्स्प्रेसने ४ महिलांना चिरडलंय, आसनगाव रेल्वे स्थानकादरम्यान गोदान एक्सप्रेसने या महिलांना उडवलं, या अपघातात चारही महिलांचा जागीच मृत्यू झालाय.

 ही घटना आज दुपारी अडीच वाजता घडली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गोदान एक्सप्रेसने या महिलांना धडक दिली. रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर २ जवळ हा अपघात झाला.

शहापूरमधील गुरुद्वारात आमावस्येच्या दुसऱ्या दिवसाच्यानिमित्ताने कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला आलेल्या महिला आसनगाव स्टेशनवर उतरल्यानंतर ट्रॅक क्रॉस करत होत्या. त्याचवेळी वेगाने आलेल्या गोदान एक्स्प्रेसने त्यांना धडक दिली. यात चारही महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.