केबीसी, मैत्रेयनंतर नाशकात आणखी एक घोटाळा उघड

केबीसी आणि मैत्रेय ग्रुपनं ठेवीदारांना गंडवल्याचं प्रकरण ताजं असतानाच, नाशिकमध्ये आणखी एक घोटाळा उघड झालाय. या प्रकरणी गंगापूर रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यत आलाय. तर आर्थिक गुन्हे शाखाही तपास करतेय. 

Updated: Aug 23, 2016, 12:48 PM IST
केबीसी, मैत्रेयनंतर नाशकात आणखी एक घोटाळा उघड title=

नाशिक : केबीसी आणि मैत्रेय ग्रुपनं ठेवीदारांना गंडवल्याचं प्रकरण ताजं असतानाच, नाशिकमध्ये आणखी एक घोटाळा उघड झालाय. या प्रकरणी गंगापूर रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यत आलाय. तर आर्थिक गुन्हे शाखाही तपास करतेय. 

नाशिकचे गणेश देसाई यांनी हाऊस ऑफ इन्वेस्टमेंट या कंपनीत काही रक्कम गुंतवली होती. ही रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवून जादा दरानं व्याज देण्याचं आमिष या कंपनीनं दाखवलं होतं. मात्र तसं काहीच न झाल्यानं देसाई यांनी हाउस ओंफ इन्व्हेस्टमेंटचे संचालक विनोद पाटील याच्यासह दहा जणांवर गंगापूर रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

हाउस ओंफ इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या संचालक मंडळातले बहुतेक संशयित हे एमबीए फायनान्स विषयाचे पदवीधारक आहेत. या प्रकरणात दीडशेहून अधिक तक्रारी दाखल झाल्यात. आता आर्थिक गुन्हे शाखेकडे फसवणुकीचा हा गुन्हा वर्ग करण्यात आलाय. 

आपल्या उच्च शिक्षणाचा फायदा घेऊन त्यांनी ठेवीदारांना ऑनलाईन ट्रेडींगचे आमिष दाखवून गंडा घातलाय. हाउस ऑफ इन्वेस्टमेंटसारख्याच पाच ते सहा बोगस कंपनी सुरु करून त्यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केलीय. नाशिकसह दुबई, अमेरिकेतही कंपनीची गुंतवणूक असल्याची माहिती प्रथमदर्शनी मिळत असून त्या दृष्टीने पोलीस तपास सुरु आहे. 

या प्रकरणी पोलीस जास्तीत जास्त पुरावे गोळा करत आहेत. मात्र या प्रकरणातले संशयित आरोपी देश सोडून इतरत्र जाणार नाहीत याची खबरदारीही पोलिसांना घ्यावी लागणार आहे.