चंद्रपूर येथे संतप्त गावकऱ्यांनी शाळेला ठोकले कुलूप

 जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील सर्वांग विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी शाळेला कुलूप ठोकत  शाळा बंद केली.

Updated: Dec 17, 2015, 04:06 PM IST
चंद्रपूर येथे संतप्त गावकऱ्यांनी शाळेला ठोकले कुलूप title=

चंद्रपूर : जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील सर्वांग विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी शाळेला कुलूप ठोकत  शाळा बंद केली.

शाळेत इंग्रजी आणि गणित विषयाचे नियमित शिक्षक नसल्यामुळे संतप्त पालकांनी हे पाऊल उचलले. सर्वांग विकास विद्यालयाचे संस्थाचालक हे मनमानी पध्दतीने शिक्षकांच्या भरती करतात आणि ऐन सत्राच्या मध्यातच त्यांना काढतात असा पालकांचा आरोप आहे. 

प्रकरण तापल्यावर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी स्वतः या शाळेत दाखल झाले आणि त्यांनी सर्व घटकांशी चर्चा करून काढून टाकलेल्या शिक्षकांना रुजू करून घेण्याचे स्पष्ट आदेश दिले. 

मात्र तरीही अद्याप या शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे पालकांनी शाळेला कुलूप लावून नियमित शिक्षकांची नेमणूक झाल्याशिवाय पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतलाय. आता ८ दिवसापासून शिक्षक, विद्यार्थी, पालक शाळेबाहेर आणि मुजोर शाळा संचालक बेपत्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.