कोल्हापूर : जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशीही पावसाची संततधार सुरुच आहे. धरण क्षेत्रात सुरु असलेल्या दमदार पावसामुळे राधानगरी धरनाचे चार दरवाजे पुन्हा उघडले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेत.
यातून सध्या सात हजार नऊशे क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग पंचगगेत होतोय.यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्यान वाढ होतीय. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडलीय.पंचगंगेची पाणीपातळी चाळीस फूट एक इंच इतकी झाली असून तिची वाटचाल आता धोका पातळीकडे सुरु आहे. यामुळे जिल्ह्यात महापुराची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झालीय.
या सर्व पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिलेत.खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूरहुन रत्नागिरीकडे जाणाऱ्या मार्गावरील शिवाजी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय.ही वाहतूक आता पर्यायी मार्गाने सुरु आहे.