म्हणून अकोल्याचे जिल्हाधिकारी झाले ड्रायव्हर

अकोल्याचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी चक्क ड्रायव्हरची भूमिका पार पाडली.

Updated: Nov 4, 2016, 10:16 PM IST
म्हणून अकोल्याचे जिल्हाधिकारी झाले ड्रायव्हर  title=

अकोला : अकोल्याचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी चक्क ड्रायव्हरची भूमिका पार पाडली. जिल्हाधिका-यांच्या शासकीय वाहनाचे चालक दिगंबर ठक तब्बल 33 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले. आपल्या या चालकाचा सन्मान करण्यासाठी श्रीकांत यांनी त्यांना अनोखं गिफ्ट दिलं. ठक यांना निरोप समारंभाच्या ठिकाणी नेण्यासाठी श्रीकांत यांनी स्वतः सरकारी गाडी चालवली.

शासकीय निवासस्थानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ते स्वत:  ड्रायव्हर बनले. शिवाय सेवानिवृत्ती समारंभात ठक यांच्या कुटुंबियांचाही सन्मान करण्यात आला. या अनोख्या सन्मानानं दिगंबर ठक यांना अक्षरशः गहिवरून आलं.

दररोज आपली गाडी चालवणा-या चालक सहका-याचा हा सन्मान आपल्याला वेगळाच आनंद देऊन गेल्याची भावना जिल्हाधिका-यांनी व्यक्त केली आहे.

जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचं हे सारथ्य अकोला शहरात सध्या कौतुकाचा विषय ठरलंय. सरकारी अधिकारी म्हटलं की, अनेकदा नाकं मुरडली जातात, त्यांच्यावर टीका होते, पण जी. श