अखिल भारतीय नृत्य संमेलनाला सुरूवात

नाशिक शहरात दुसरे अखिल भारतीय नृत्य संमेलनाला शनिवारपासून परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरुवात झाली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 1, 2017, 03:04 PM IST
अखिल भारतीय नृत्य संमेलनाला सुरूवात title=

नाशिक : नाशिक शहरात दुसरे अखिल भारतीय नृत्य संमेलनाला शनिवारपासून परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरुवात झाली आहे.

 कलासिद्धी नृत्यालय सासवड, कर्मवीर भाऊसाहेब हिरे प्रतिष्ठान आणि कीर्ती कलामंदिर यांच्याकडून हे संमेलन आयोजिक करण्यात आलं आहे.

 एकूण ४ सत्रांत हे संमेलन पार पडणार आहे. दीपनृत्यानंतर दीपप्रज्वलन करून माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन केलं. यावेळी सादर करण्यात आलेल्या विविध नृत्यांनी नाशिककर मंत्रमुग्ध झाले होते.