फोनवर बोलताना अजितदादांसमोरचा माईक सुरु राहिला आणि...

इंदापूरमध्ये शेतकरी मेळाव्यासाठी आलेल्या अजित पवारांचं फोनवरचं संभाषणाची चर्चा सुरु आहे.

Updated: Nov 5, 2016, 07:07 PM IST
फोनवर बोलताना अजितदादांसमोरचा माईक सुरु राहिला आणि...  title=

इंदापूर : इंदापूरमध्ये शेतकरी मेळाव्यासाठी आलेल्या अजित पवारांचं फोनवरचं संभाषणाची चर्चा सुरु आहे. भाषणाला उभे राहिलेल्या अजित पवारांना वारंवार फोन यायचे आणि भाषण बंद व्हायचे.

एकदा तर दादांनी "मला कळाले , मला कळाले मी बोलतो तुला नंतर, आणि हो  तुझ्या सोबत जो आहे त्याला सांगू नकोस" असं म्हणाले. पण भाषणासाठी असलेल्या माईकवरूनच हा आवाज ऐकू गेला आणि भर सभेमध्ये हशा पिकला. अजित पवारांनीही मग त्यालाच राजकारण म्हणतात अशी कोटी केली आणि पुन्हा एकदा हशा पिकला.

अजितदादांना आलेला हा फोन कोणाचा होता हे मात्र गुलदस्त्यातच राहिलं. विधान परिषद निवडणुकींचे अर्ज मागे घ्यायचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे या निवडणुकांसाठीच अजितदादांना फोन येत होते का असे प्रश्न उपस्थित होत आहेत.