जेव्हा पोलिसालाच न्याय मिळत नाही...

पोलिसांनाच न्यायासाठी झगडावं लागलं तर? अहमदनगरमध्ये एका निलंबित पोलीस कर्मचाऱ्याबाबत असा प्रसंग घडलाय.

Updated: Aug 13, 2015, 10:39 PM IST
जेव्हा पोलिसालाच न्याय मिळत नाही... title=

निखिल चौकर, झी मीडिया, अहमदनगर : पोलिसांनाच न्यायासाठी झगडावं लागलं तर? अहमदनगरमध्ये एका निलंबित पोलीस कर्मचाऱ्याबाबत असा प्रसंग घडलाय.

पोलीस हेड कॉन्स्टेबल राजाराम शेंडगे... अहमदनगरमधल्या शिवाजी नगर भागात ते राहतात... रात्री उशिरा घरात चोर शिरल्याचं लक्षात येताच शेंडगेंनी पोलीस स्टेशनला फोन केला. स्वरक्षणासाठी हवेत गोळीबार केला आणि आरडाओरड करुन दरोडेखोरांना पळवून लावलं. पण तक्रार दाखल करायला गेलेल्या शेंडगेंना पोलिसांच्या अरेरावीचा सामना करावा लागला. तब्बल सहा तासांनी त्यांची तक्रार दाखल करुन घेतली.

दरम्यान यासंदर्भात कोतवाली पोलिसांनी बोलण्यास नकार दिलाय. पोलीस खात्यात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यालाच असा अनुभव असेल तर तिथं सामान्यांची काय कथा.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.