अहमदनर : चेन्नईतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अहमदनगर जिल्ह्यात देहविक्री करणाऱ्या महिला पुढे सरसावल्या आहेत. एक दिवस एका वेळेचा अन्नत्याग करून, या महिलांनी आपल्या एका दिवसाची कमाई पूरग्रस्तासाठी दिली आहे.
(व्हि़डीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)
अशा प्रकारे या महिलांनी तब्बल १ लाख रुपये जमा केले आहेत. एक लाख रुपयांचा हा निधी पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यासाठी, अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांना धनादेशाच्या रुपात देण्यात आला आहे.
स्नेहालय संस्था पुढल्या एक महिन्यात आणखी पाच लाख रुपये जमा करून देणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.