बीड : पोटच्या तीन पोरांना विष पाजून महिलेनं आत्महत्या केल्याची घटना बीडमध्ये उघडकीस आलीये. अंबाजोगाई पोलिस ठाण्यामागेच हा धक्कादायक प्रकार घडल्याचं वृत्त आहे.
नूरजहाँ शेख असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. १२ वर्षीय नेहा, ८ वर्षीय शेख तोहीब आणि ५ वर्षीय शेख आयुब या मुलांना तिनं विष पाजलंय. यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
महिलेचा पती परळीमध्ये वॉचमन म्हणून काम करतो. सकाळी पती घरी आल्यानंतर कोणीच दार उघडत नसल्यानं खिडकीतून डोकावून पाहिलं असता हा प्रकार उघडकीस आला.