पुणे : सध्या ऑनलाईन मार्केट तेजीत आहे. प्रत्येक जण घरबसल्या ऑनलाईनला महत्व देत आहे. अशीच एक पेईंग गेस्टची जाहिरात olx वर दिली. ही जाहिरात पाहून एक व्यक्ती पेईंग गेस्ट म्हणून राहण्यास आला. मात्र, त्याने चोरी करुन पोबारा केल्यानंतर तो चोर असल्याचे नंतर लक्षात आले
पेईंग गेस्ट म्हणून आलेल्या व्यक्तीने ३७ हजार रुपयांची घरफोडी करून घरमालकालाच ११ दिवसांनी पकडण्यामध्ये पोलिसांना यश आले. दरम्यान त्याच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोरखनाथ तथा अर्जुन दादासाहेब वाघ (२०, वकीलनगर, एरंडवणे) मूळगाव हारशी खुर्द, तेली गल्ली, पैठण, जि. औरंगाबाद येथील असून त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे झडती घेतली असता २५ हजार रुपये किमतीचा कॅनन कंपनीचा डिजिटल कॅमेरा, १२ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, इन्टेक्स कंपनीचे स्पीकर आणि निळ्या रंगाची बॅग असा ऐवज सापडला.
कोथरूड येथील अमित सिंग यांना गेल्या महिन्यात एक पेईंग गेस्टबाबत जाहिरात दिली होती. ही जाहिरात वाचून गोरखनाथ हा सिंग यांच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहण्यासाठी आला. मात्र, ३० सप्टेंबर रोजी त्याने चोरी केली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.