नाशिक : नाशिक जिल्ह्यातील होलसेल औषध विक्रेते अन्न औषध प्रशासन विभागाच्या रडारवर आलेत. बारा विक्रेत्यांवर कारवाईला सुरवात झाली असून दोघांवर एफ आय आर दाखल झालेत तर सहा जणांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेत आणि चौघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय.
सिपला कंपनीचे औषध सवलतीच्या दरात विकत घेऊन जास्त दरात इतर विक्रेत्यांना विकल्याचा अन्न औषध प्रशासन विभागाचा आरोप आहे. गेल्या अनेक दिवसापासून बनावट बिल, सही शिक्यांच्या माध्यमातून लाखो रुपयाची फसवणूक केल्याचा प्रशासनाचा दावा आहे. ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप औषध विक्रेत्यांनी केला असून कारवाईच्या विरोधात नाशिक जिल्हा केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशन बंद पुकारलाय.