रूग्णालय अधीक्षकाच्या घरात सापडलं घबाड

पगार बिल मंजूर करण्यासाठी ३० हजाराची लाच घेताना वैजापूर रुग्णालय अधीक्षक गोविंद नरवणे याला २४ जानेवारीला अटक झाली होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीमध्ये त्याच्या घरात मोठं घबाड सापडलंय. 

Updated: Jan 28, 2015, 07:27 PM IST
रूग्णालय अधीक्षकाच्या घरात सापडलं घबाड title=

औरंगाबाद : पगार बिल मंजूर करण्यासाठी ३० हजाराची लाच घेताना पकडलेल्या रुग्णालय अधीक्षकाच्या घरात कोट्यवधींचं घबाडचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सापडलंय. 

वैजापूर रुग्णालय अधीक्षक गोविंद नरवणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं (एसीबी) २४ जानेवारीला अटक केली होती. त्यानंतर एसीबीने केलेल्या चौकशीमध्ये त्याच्या घरात मोठं घबाडच आढळून आलंय. 

औरंगाबादमधील त्यांच्या घराची झडती घेतली असताना लॉकरमध्ये तब्बल ७७ तोळे सोनं आणि ७८ किलो चांदी तसंच ४७ लाख रुपयांच्या फिक्स्ड डिपाजिटची कागदपत्रं एसीबीनं ताब्यात घेतली आहेत.

त्याचबरोबर नरवणेचं आणखीही काही ठिकाणी घरं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. नरवणेकडं सापडलेलं हे सगळं घबाड अंदाजे एक कोटींच्या घरात आहे.
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.