ऑइल मिलमध्ये केमिकल गॅस टाकीत पडून नऊ कामगार दगावले

लातूरच्या किर्ती गोल़्ड ऑईल कंपनीच्या ढिसाळ व्यवस्थापानामुळे कंपनीतले पाच कामगार आणि चार मजुरांचा बळी गेलाय. मुख्य म्हणजे दुर्घनटनेनंतर कंपनीचे अधिकारी, मालक कंपनीतून पसार झालेत. रात्री उशिरा जेसीबी लावून टाकी फोडल्यावर नऊ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतांच्या नातेवाईकांनी कंपनीच्या व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.

Updated: Jan 31, 2017, 08:33 AM IST
ऑइल मिलमध्ये केमिकल गॅस टाकीत पडून नऊ कामगार दगावले title=

लातूर : लातूरच्या किर्ती गोल़्ड ऑईल कंपनीच्या ढिसाळ व्यवस्थापानामुळे कंपनीतले पाच कामगार आणि चार मजुरांचा बळी गेलाय. मुख्य म्हणजे दुर्घनटनेनंतर कंपनीचे अधिकारी, मालक कंपनीतून पसार झालेत. रात्री उशिरा जेसीबी लावून टाकी फोडल्यावर नऊ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतांच्या नातेवाईकांनी कंपनीच्या व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.

सोयाबीन, सूर्यफूल अशा विविध खाद्य तेलाची नामांकित कंपनी असलेल्या लातूरच्या कीर्ती ऑइल मिलमध्ये काल सायंकाळी मोठी दुर्घटना घडली. हरंगुळ एमआयडीसीमध्ये असलेल्या कीर्ती ऑइल मिलची केमिकलच्या गाळाची टाकी साफ करण्यासाठी ०४ मजूर टाकीत उतरले होते. परंतु टाकीतील उग्र रासायनिक वासामुळे टाकीत उतरलेले मजूर बाहेर आलेच नाहीत. त्यामुळे थोड्यावेळाने एक एक करून कीर्ती ऑईल मिल मधील ०५ कर्मचारीही त्या टाकीत उतरले. टाकीतील गाळ  आणि उग्र वासामुळे ०४ मजूर आणि ०५ कर्मचारी असे ०९ जण त्यात अडकून त्यांना आपला जीव गमवावा लागला. 

सायंकाळी उशिरा याची माहिती कीर्ती ऑईल प्रशासनाला लागली त्यावेळी कंपनीचे मालक आणि इतर अधिकारी तिथून पसार झाले. रात्री उशिरा मजूर आणि कर्मचारी अडकलेली टाकी जेसीबीच्या सहाय्याने फोडून त्या गाळात फसलेले, गुदमरून मरण पावलेले ०९ मृतदेह बाहेर काढण्यात आले. 

आता निष्काळजीपणे केमिकलच्या टाकीत उतरविणाऱ्या कीर्ती ऑइल मिलच्या मालक आणि अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे. 

घटनेची माहिती मिळताच लातूरचे पालकमंत्री तथा कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी स्वतः पाहणी केली. मात्र यावेळी मृतांच्या नातेवाईकांनी काही काळ कामगारमंत्र्यांना घेराव घातला. तसेच यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर संभाजी पाटील निलंगेकर यांनी कीर्ती ऑइल मिलवर कठोर कारवाई करून कंपनी सील करण्याचे आदेश दिले. 

खाद्य तेलाची नामांकित कंपनी असलेल्या कीर्ती ऑइल मिल मध्ये मजूर आणि कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कुठल्याच उपाययोजना का केल्या नाहीत ? केमिकलच्या टाकीत गाळ काढण्यासाठी कामगार थेट उतरलेच कसे? इतकी मोठी घटना होऊनही कीर्ती ऑइल मिलचा एकही अधिकारी तिथे का उपस्थित नव्हता ? मृतांच्या नातेवाईकांना आणि पोलिसांना याची तात्काळ सूचना का देण्यात आली नाही ? असे एक ना अनेक प्रश्न यामुळे निर्माण झाले आहे. 
त्यामुळे आता कीर्ती ऑइल मिल कंपनीच्या मालकांवर आणि मिल प्रशासनावर काय कारवाई होते हे पाहणे गरजेचे आहे.