बीडच्या गेवराईजवळ साडेनऊ लाखांच्या जुन्या नोटा हस्तगत

हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी नेत असताना बीड पोलिसांनी नोटा ताब्यात घेतल्यात. आता या नोटा कोण बदलुन देणार होतं याचा तपास आता सुरू झालाय. 

Updated: Feb 26, 2017, 01:09 PM IST
बीडच्या गेवराईजवळ साडेनऊ लाखांच्या जुन्या नोटा हस्तगत title=

बीड : हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी नेत असताना बीड पोलिसांनी नोटा ताब्यात घेतल्यात. आता या नोटा कोण बदलुन देणार होतं याचा तपास आता सुरू झालाय. 

दरम्यान 9 लाख पन्नास हजार रुपयांच्या या जुन्या नोटा होत्या. शेवगावहून गेवराईकडे या नोट्या नेल्या जात होत्या. यावेळी एक कारही ताब्यात घेण्यात आलीय. 

औरंगाबादमधल्या नारेगावच्या जमीर खान जुन्या नोट बदलण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. चकलांबा पोलिसांनी शुक्रवारी दहा वजाता चकलांबा फाट्यावर सापळा रचून एम एच 21 व्ही 7802 या क्रमांकाची अल्टो कार ताब्यात घेतली. 

या नोटा चलनातून बाद झालेल्या असताना जमीर खान त्या कुणाकडून बदलून घेणार होता याचा तपासही पोलीस करतायत. या घटनेमुळे परिसरता मात्र खळबळ उडालीये.