नोटाबंदीचे 50 दिवस... शेतकऱ्यांच्या विवंचना कायम!

नोटाबंदीच्या निर्णय़ाला 50 दिवस पूर्ण झालेत. पंतप्रधान मोदींनी मागितलेली मुदत आज संपतेय. ही मुदत कायदेशीर नसली, तरी आता लोकांचा त्रास कमी व्हायला हवा ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. आता तरी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या सुटणार का?

Updated: Dec 28, 2016, 06:14 PM IST
नोटाबंदीचे 50 दिवस... शेतकऱ्यांच्या विवंचना कायम! title=

मुंबई : नोटाबंदीच्या निर्णय़ाला 50 दिवस पूर्ण झालेत. पंतप्रधान मोदींनी मागितलेली मुदत आज संपतेय. ही मुदत कायदेशीर नसली, तरी आता लोकांचा त्रास कमी व्हायला हवा ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. आता तरी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या सुटणार का?

कापूस पडून आहे... तुरीवर फवारणी करायचीय पण औषधाला पैसे नाहीत... नोटाबंदीची घोषणा चांगली असली तरी मालाला मार्केट नाही... अशी शेतकऱ्यांची ओरड नोटाबंदीच्या निर्णयाला 50 दिवस झाल्यानंतरही कायम आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या या प्रतिक्रिया पुरेशा बोलक्या आहेत. 

कांदा, टोमॅटोचे भाव मातीमोल झालेत... माल आहे पण हाती रोख रक्कम नाही. व्यापाऱ्यांनी दिलेला चेक बँकेत भरला तर बँका कर्जाचा हप्ता कापून घेतात. फवारणीसाठी औषधं घ्यायला पैसे नाहीत. अशा अनेक विवंचना बळीराजाला सतावतायत... काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नवी दिल्लीमध्ये पंतप्रधानांकडे काही मागण्या केल्यात. यात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांना त्यांनी वाचा फोडलीय.

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना राहुल गांधींनी याच मागण्या स्वतः पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्या कानी घातल्या होत्या. मात्र, त्यावेळी पंतप्रधानांनी 'वरचेवर भेटत चला' असं सांगत काँग्रेसच्या शिष्टमंडळाची बोळवण केली. गांधींच्या या मागण्यांवर भाजपाकडे आजही ठोस उत्तर नाही, असंच दिसतंय.

राहुल गांधींच्या मागण्यांवर उत्तर देण्याऐवजी त्यांची खिल्ली उडवण्यात भाजपा नेते धन्यता मानतायत. पंतप्रधानांनी सांगितलेली 50 दिवसांची मुदत आता पूर्ण झालीय. आता तरी केंद्र सरकार शेतकऱ्यांना दिलासा देईल अशी आशा करूया.