उल्हासनगरमध्ये पाण्यावरून टँकर चालकासह एकाला मारहाण

राज्यात भीषण पाणीटंचाई असताना उल्हासनगरमध्ये पाण्यावरुन हाणामारी झाली आहे. कॅम्प नंबर 5 नेताजी चौक भागात पाण्याच्या टँकरवरुन एकावर चॉपर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात प्रीतमसिंग लबना हे 49 वर्षीय इसम गंभीर जखमी झाले आहेत. 

Updated: May 1, 2016, 09:34 PM IST
उल्हासनगरमध्ये पाण्यावरून टँकर चालकासह एकाला मारहाण title=

उल्हासनगर : राज्यात भीषण पाणीटंचाई असताना उल्हासनगरमध्ये पाण्यावरुन हाणामारी झाली आहे. कॅम्प नंबर 5 नेताजी चौक भागात पाण्याच्या टँकरवरुन एकावर चॉपर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात प्रीतमसिंग लबना हे 49 वर्षीय इसम गंभीर जखमी झाले आहेत. 

गेल्या अनेक दिवसांनापासून उल्हासनगरमध्ये आठवड्यातून तीन दिवसच पाणीपुरवठा होतोय. प्रीतम सिंग लबना हे पाण्याचा टँकर घेऊन नेताजी चौकात गेले होते. या टँकरमधून पाणीवाटप होत असताना चौघेजण तिथं आले आणि त्यांनी आम्हाला आधी पाणी द्या अशी मागणी प्रीतमसिंग यांच्याकडे केली. मात्र त्यांनी या चौघांना रांगेत येण्यास सांगितलं. यामुळं संतापलेल्या चौघांनी प्रीतमसिंग आणि टँकर चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसंच लोखंडी चॉपरनं लबना यांच्यावर हल्ला केलाय. यात लबना हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी चार आरोपींना अटक केलीय.