बीडमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ४ जणांना अंधत्व

बीड जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चार रुग्णांना अंधत्व आल्याची घटना घडलीये. 

Updated: Apr 24, 2016, 01:20 PM IST
बीडमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ४ जणांना अंधत्व title=

बीड : बीड जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चार रुग्णांना अंधत्व आल्याची घटना घडलीये. 

या रुग्णालयात 16 रुग्णांच्या डोळ्यांवर शुक्रवारी शस्त्रक्रिया झाली होती. मात्र ऑपरेशननंतर सुभद्रा भोसले, भगूबाई विघ्ने, भानुदास विघ्ने, मालनबाई जमदाडे, आणि विठ्ठल काळे या पाच जणांना याचा त्रास झाला. 

या पाचही जणांना मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. मात्र त्यापैकी फक्त एकाच रुग्णाचे डोळे वाचवण्यात डॉ लहानेंना यश आलं. मात्र इतर चार जणांना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आपली दृष्टी गमवावी लागली.