अहमदनगर येथील अपघातात ४ ठार, २१ जखमी

येथील चिखली येथे आज सकाळी पिकअप व्हॅन आणि कंटेनर यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात ४ मृत्यू तर २१ जण जखमी झाले आहेत.

Updated: Oct 13, 2015, 08:42 AM IST
अहमदनगर येथील अपघातात ४ ठार, २१ जखमी title=

अहमदनगर : येथील चिखली येथे आज सकाळी पिकअप व्हॅन आणि कंटेनर यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात ४ मृत्यू तर २१ जण जखमी झाले आहेत.

चिखली येथे पिकअप व्हॅन भाविकांना घेऊन जात होती. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने धडक दिली. यामध्ये पिकअपमधील ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर २१ जण जखमी झाले असून, त्यांना नगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.