कोल्हापुरात एसटी अपघातात 35 प्रवासी जखमी

पाटपन्हाळा मार्गावर चौकेवाडी येथे एसटीच्या अपघातात 35 प्रवासी जखमी झालेत. जखमी प्रवाशांना तात्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले.

Updated: Sep 14, 2016, 07:51 PM IST
कोल्हापुरात एसटी अपघातात 35 प्रवासी जखमी title=

कोल्हापूर : पाटपन्हाळा मार्गावर चौकेवाडी येथे एसटीच्या अपघातात 35 प्रवासी जखमी झालेत. जखमी प्रवाशांना तात्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले.

चौकेवाडीहून कोल्हापूरला येणाऱ्या एसटी बसचा अपघात झाला.  पाटपन्हाळाजवळ एसटी उलटल्याने 35 हून अधिक प्रवासी जखमी झालेत.  जखमींना कोल्हापूरच्या सीपीआर रूग्णालयात हलविण्याचे आले.  बसवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, म्हैस आडवी आल्यामुळे चालकाने ब्रेक दाबल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.