यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील पुसद इथल्या एका गुंडानं हुज्जत घालत पोलिसांवरच प्राणघातक हल्ला चढविला. यामध्ये तीन पोलीस गंभीर जखमी झालेत.
पुसदच्या शिवाजी चौकात बकरी ईदनिमित्तानं बंदोबस्तावर असलेल्या योगेश डोंगरवार या पोलीस कर्मचाऱ्याशी हल्लेखोरानं विनाकारण हुज्जत घातली... त्यांचा वाद सुरू असताना सुदर्शन आघाव सुदर्शन आघाव आणि अमोल बदकुले हे अन्य दोन पोलीस कर्मचारी तिथं दाखल झाले. त्यांनी या युवकाला हटकण्याचा प्रयत्न केला. त्यावरून चिडलेल्या युवकानं थेट पोलिसांनाच चाकूने भोसकलं. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले.
अधिक वाचा - पालघर: पोलीस उप-निरीक्षकावर प्राणघातक हल्ला, प्रकृती गंभीर
जखमी पोलिसांवर पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून पोलिसांनी हल्लेखोर युवकास अटक केली आहे. दरम्यान या अटकेमुळे पुसदमध्ये तणावाची स्थिती आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.