इंदापूरजवळील अपघातात ३ महाविद्यालयीन तरूण जागीच ठार

पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ रात्री अपघात झाला. या अपघातात तीन तरूण जागीच ठार झाले.

Updated: Jan 28, 2017, 12:41 PM IST
इंदापूरजवळील अपघातात ३ महाविद्यालयीन तरूण जागीच ठार title=

इंदापूर : पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ रात्री अपघात झाला. या अपघातात तीन तरूण जागीच ठार झाले.

मोटार सायकलनं मागून वॅगनारला धडक दिली, आणि या धडकेत तीन जण जागीच ठार झाले. अभिजीत पाटील, दिग्विजय सुभाष लोखंडे आणि संदीप दशरथ ढवळे अशी मृतांची नावं आहेत. हे तिन्ही तरूण अकलूजमधल्या कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी होते.