कल्याण डोंबिवलीत लागली यांना लॉटरी

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत  मतदान होण्याआधीच शिवसेना, भाजप आणि बसपनं आपलं खातं उघडलंय...

Updated: Oct 17, 2015, 10:26 AM IST
कल्याण डोंबिवलीत लागली यांना लॉटरी title=

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत  मतदान होण्याआधीच शिवसेना, भाजप आणि बसपनं आपलं खातं उघडलंय... 27 गावातल्या मिलापनगर भागातून शिवसेनेच्या प्रेमा म्हात्रे, खंबाळपाड्यातून भाजपचे शिवाजी शेलार आणि आशेले चिंचपाडामधून बसपच्या सोनी अहिरे हे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आलेत...

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीला आता चांगलाच रंग आलाय... 1 नोव्हेंबरला होणा-या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली... 

सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर आपली ताकद आजमावत असल्यानं ही निवडणूक बहुरंगी आणि चुरशीची ठरणाराय... या निवडणुकीत भाजपला बंडखोरीचं ग्रहण लागलंय... 

तब्बल 10 भाजप बंडखोरांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले असून, उमेदवारी मागे घेण्यास त्यांनी ठाम नकार दिलाय. राष्ट्रवादीतून आलेले आमदार गणपत गायकवाड भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा आरोप या बंडखोरांनी केलाय

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.