'एमआयएम पक्षातही उमेदवारी तिकीट देण्यासाठी २५ लाखांची मागणी'

ठाणे मनपा निवडणुकीत तिकीट वाटपामध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप याआधीच भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी केला असतानाच आता मुंब्र्यातही एमआयएम पक्षातही तिकीटवाटपावरून आरोप झाले आहेत.

Updated: Feb 7, 2017, 06:03 PM IST

ठाणे : ठाणे मनपा निवडणुकीत तिकीट वाटपामध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप याआधीच भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी केला असतानाच आता मुंब्र्यातही एमआयएम पक्षातही तिकीटवाटपावरून आरोप झाले आहेत.

मुंब्र्यात प्रभाग क्रमांक 30 मधून उमेदवारीसाठी पक्षाकडून 25 लाखांची मागणी करण्यात करण्यात आल्याचा आरोप इच्छूक उमेदवार ताजुद्दीन युनीस खान यांनी केलाय. हे आरोप एमआयएमचे कळवा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष मझर लाला यांनी फेटाळलेत. 

हैदराबादमधील एमआयएमचे आमदार कौसर मोईउद्दीन हे ठाण्यात निरीक्षक म्हणून काम पहात आहेत. त्यांनी पक्षाची अधिकृत उमेदवारी देण्यासाठी २५ लाखांची मागणी केली होती, असा आरोप ताजुद्दीन खान यांनी केला आहे. 

पंचवीसपैकी पाच लाख रुपये दिल्याने पक्षाने उमेदवारी देऊ केली आहे. मात्र, ही निवडणूक लढविणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. एमआयएमचा खरा चेहरा समोर आणण्यासाठीच आपण तिकीट मागितल्याचं खान यांचं म्हणणं आहे.