बॅंकेत २५ किलो बनावट सोने तारण, लिलावाच्यावेळी फुटले भांडे

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मोखाडा शाखेत शाखा व्यवस्थापक आणि बँकेच्या सोनाराच्या संगनमतानं, दहा ठेवीदारांनी जिल्हा बँकेला हातोहात फसवल्याचं उघड झालंय. या ठेवीदारांनी २५ किलो बनावट सोनं तारण ठेवून, जवळपास सव्वा कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं.

Updated: Apr 30, 2016, 02:58 PM IST
बॅंकेत २५ किलो बनावट सोने तारण, लिलावाच्यावेळी फुटले भांडे  title=
संग्रहित

ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मोखाडा शाखेत शाखा व्यवस्थापक आणि बँकेच्या सोनाराच्या संगनमतानं, दहा ठेवीदारांनी जिल्हा बँकेला हातोहात फसवल्याचं उघड झालंय. या ठेवीदारांनी २५ किलो बनावट सोनं तारण ठेवून, जवळपास सव्वा कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं.

मोखाडा बँकेतला हा घोटाळा जवळपास अडीच कोटी रुपयांच्या घरात असेल अशी शंका बँकेचे अध्यक्ष बाबाजी पाटील यांनी व्यक्त केलीय. या प्रक्ररणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा तसंच इडीमार्फत करण्याची मागणी केली जातेय. 

वारंवार नोटीस देऊनही थकीत ठेवीदारांनी आपल्या सुवर्ण कर्जाची रक्कम भरली नाही. म्हणून बँकेनं त्यांनी तारण ठेवलेल्या सोन्याचा लिलाव केला असता, हा सारा प्रकार उघड झाला.