राज्यातले २४ कामगार सौदी अरेबियात ओलीस

नागपूरमधल्या काही कामगारांना सौदी अरेबियात ओलीस ठेवण्यात आल्याचं समोर आलंय. राज्यातले असे २४ कामगार तिथं अडकून पडल्याची माहिती आहे. मोठ्या पगाराचं आणि चांगल्या नोकरीचं आमिष दाखवून या कामगारांना एका कंपनीनं सौदी अरेबियाला नेलं होतं. पण चांगली नोकरी आणी पगार तर दूरच, त्यांना पोटभर जेवणही मिळत नाहीय. एवढंच नाही, तर त्यांचे पासपोर्टही जप्त करण्यात आलेत. 

Updated: Feb 11, 2015, 11:09 PM IST
राज्यातले २४ कामगार सौदी अरेबियात ओलीस title=

नागपूर: नागपूरमधल्या काही कामगारांना सौदी अरेबियात ओलीस ठेवण्यात आल्याचं समोर आलंय. राज्यातले असे २४ कामगार तिथं अडकून पडल्याची माहिती आहे. मोठ्या पगाराचं आणि चांगल्या नोकरीचं आमिष दाखवून या कामगारांना एका कंपनीनं सौदी अरेबियाला नेलं होतं. पण चांगली नोकरी आणी पगार तर दूरच, त्यांना पोटभर जेवणही मिळत नाहीय. एवढंच नाही, तर त्यांचे पासपोर्टही जप्त करण्यात आलेत. 

सध्या नागपुरात स्थायिक असलेले अशोक मेहता यांचे जावई श्रीनिवास सिंह चांगल्या नोकरीच्या शोधात सौदी अरेबियाला गेले. वेल्डिंगचं काम करणाऱ्या श्रीनिवास सिंह यांना मुंबईच्या खार भागातील एका एजन्सीनं चांगल्या पगाराची नोकरी देण्याचं आमिष दाखवलं. या आमिषाला बळी पडून ते सौदी अरेबियाच्या मोसासा भागात कामासाठी गेले पण श्रीनिवास यांना आश्वासन दिलेलं काम आणि तो पगार तर दिला जाताच नाही, उलट त्यांना बंधक बनवलंय आणि त्यांना कुणालाही भेटू दिलं जात नाही. इतकंच काय तर त्यांचा पासपोर्ट आणि इतर कागदपत्रंही जप्त केल्याची तक्रार अशोक मेहता यांनी केलीय.

पैशाच्या मोहाला बळी पडलेले श्रीनिवास सिंह एकटे नाही. तर त्यांच्यासारखे नागपूर आणि राज्यातल्या व्यक्तींनाही ओलीस ठेवल्याचं समोर आलंय. अरुण कुमार, सुनिल राजभर आणि मुकेश कुमार अशी त्यांची नावं आहेत. मुंबईतल्या जमीर इंटरप्रायजेस मॅन पॉवर सप्लाय एजन्सीतर्फे सौदीमध्ये नोकरीसाठी जाहीरात देण्यात आली होती. 

दरम्यान नातेवाईकांनी जमीर इंटरप्रायजेसध्ये संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कंपनीचे कार्यालय बंद असल्याचं त्यांना सांगण्यात आलंय. त्यामुळं अडकलेल्या मजुरांची सौदीमधून सुटका करावी यासाठी सरकारनं प्रयत्न करावे, अशी मागणी होतेय. 
 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.