जळगावमध्ये २ कर्जबाजारी शेतक-यांची आत्महत्या

दोन कर्जबाजारी शेतक-यांनी आत्महत्या केलीय. धरणगाव तालुक्यातल्या दोनगाव इथले युवराज नत्थू बि-हाडे आणि निंभोरा इथले संजय जयराम चौधरी, अशी त्यांची नावं आहेत. युवराज बि-हाडे यांच्यावर विविध कार्यकारी सोसायटींचं ४५ हजारांचं, तर संजय चौधरी यांच्यावर ६४ हजार रुपयांचं कर्ज होतं.

Updated: Apr 16, 2017, 04:44 PM IST
जळगावमध्ये २ कर्जबाजारी शेतक-यांची आत्महत्या title=

जळगाव : दोन कर्जबाजारी शेतक-यांनी आत्महत्या केलीय. धरणगाव तालुक्यातल्या दोनगाव इथले युवराज नत्थू बि-हाडे आणि निंभोरा इथले संजय जयराम चौधरी, अशी त्यांची नावं आहेत. युवराज बि-हाडे यांच्यावर विविध कार्यकारी सोसायटींचं ४५ हजारांचं, तर संजय चौधरी यांच्यावर ६४ हजार रुपयांचं कर्ज होतं.

बि-हाडे यांनी एक एकर शेतीवर कापूस लागवड केली होती. मात्र त्यांना उत्पन्न मिळालं नाही. त्यामुळे कर्ज कसं फिटेल याच तणावातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलंय. विशेष म्हणजे शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी आयोजित केलेली संघर्ष यात्रा जळगाव जिल्ह्यात पोहोचली असतानाच, नेमकी ही आत्महत्येची घटना घडली.