‘संस्कृती’चा लोचा; दोघांचा मृत्यू, 200 हून अधिक जखमी

संस्कृती आणि जीवघेणा खेळ, असा केमिकल लोचा या दहीहंडीच्या निमित्तानं अनेक तरुणांमध्ये पाहायला मिळालाय. यंदाच्या दहीहंडीत दोन गोविंदांनी आपले प्राण गमावलेत तर 200 हून अधिक जण जखमी झालेत. 

Updated: Aug 19, 2014, 09:59 AM IST
‘संस्कृती’चा लोचा; दोघांचा मृत्यू, 200 हून अधिक जखमी title=
फाईल फोटो

मुंबई : संस्कृती आणि जीवघेणा खेळ, असा केमिकल लोचा या दहीहंडीच्या निमित्तानं अनेक तरुणांमध्ये पाहायला मिळालाय. यंदाच्या दहीहंडीत दोन गोविंदांनी आपले प्राण गमावलेत तर 200 हून अधिक जण जखमी झालेत. 

मुंबई-ठाण्यातल्या दहीहंडी उत्सवाला एका गोविंदाच्या मृत्यूनं  गालबोट लागलंय. राजेंद्र आंबेकर असं या गोविंदाचं नाव आहे. लालबागच्या साईसदन गोविंदा पथकाचे कार्यकर्ते असलेले राजेंद्र आंबेकर यांचा मृत्यू झालाय. ठाण्यातल्या दहीहंडी उत्सवात नाचताना ते खाली कोसळले. त्यानंतर त्यांना ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, हार्ट अटॅकमुळे राजेंद्र आंबेकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. तर, दुसरीकडे रत्नागिरीत दहीहंडी फोडताना एका गोविंदाचा मृत्यू झाला. ननाटे येथील बबन उमासरे यांचा दहीहंडी फोडताना मृत्यू झाला. 

दहीहंडीच्या उत्सवाला गोविंदांच्या अपघातानं गालबोट लागलं. दहीसरच्या ओम साई फाऊंडेशनच्या दही हंडीत एक गोविंदा गंभीर जखमी झाला. बोरिवलीतही असाच काहीसा प्रकार घडला. दहीहंडीमध्ये मुंबईत 200 पेक्षा जास्त गोविंदा जखमी झालेत.

कोर्टाचे आदेश धुडकावणाऱ्या ‘त्या’ पथकावर गुन्हा दाखल

सुप्रीम कोर्ट आणि बाल हक्क संरक्षण आयोगाचे आदेश धुडकावून काल मुंबई-ठाण्यात दहीहंडी उत्सवात सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले गेल्याचं दिसून आलं. मुंबईतल्या ओम साईराम पथकाविरोधात सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. 12 वर्षाखालील मुलाचा थर लावताना वापर केल्याचा आरोप या पथकावर आहे. मेघवाडी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी या मंडळांचे प्रमुख चेतन खेतले यांच्यावर कलम १८८ नुसार न्यायालायाच्या आदेशाचं उल्लघनं केल्याचा गुन्हा दाखल केलाय.

तर दुसरीकडे आवाजाच्या मर्यादेचंही दहीहंडीच्या आयोजकांकडून उल्लंघन झालेलं दिसून आलं. अतिशय कर्णकर्कश्श आवाजात उत्सव साजरा करण्यात आला. तर वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल ठाण्यामध्ये 2500 हून अधिक गोविंदांवर कारवाई करण्यात आली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.