रायगडमध्ये जुन्या चलनातील 2.19 कोटी रूपयांच्या नोटा जप्त

रायगडच्या पालीमध्ये चलनातून बाद झालेल्या 2 कोटी 19 लाख 65 हजार रूपये किंमतीच्या 1 हजार व 500 रूपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलीसांनी 7 जणांना ताब्यात घेतले आहे. 

Updated: May 18, 2017, 01:21 PM IST
रायगडमध्ये जुन्या चलनातील 2.19  कोटी रूपयांच्या नोटा जप्त  title=

अलिबाग : रायगडच्या पालीमध्ये चलनातून बाद झालेल्या 2 कोटी 19 लाख 65 हजार रूपये किंमतीच्या 1 हजार व 500 रूपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलीसांनी 7 जणांना ताब्यात घेतले आहे. 

डोंबिवली उल्हासनगर परीसरातील काही व्यापारी आपल्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली.  त्यानुसार पोलीसांनी बुधवारी संध्याकाळी पाली - खोपोली रस्त्यावर नाकाबंदी केली.  1 स्वीफट डिझायर व 1 हुंदाई असेंट कारचा संशय आला. 

पोलिसांनी या दोन्ही गाडयांची झडती घेतली. त्यामध्ये 1 हजार व 500 रूपये किंमतीच्या चलनातून बाद झालेल्या नोटा सापडल्या . पोलीसांनी या नोटा जप्त केल्या आहेत. 

आपले काही बँक अधिकारी ओळखीचे आहेत त्यांच्याकडून 30 टक्के कमीशनवर या नोटा देतो असे एकाने या व्यापारयांना बोलावून घेतले होते. प्रमोद सावंत, नवीन जोबनपुत्रा, मोती लुधवानी, सोमनाथ प्रधान, महेश रोटे, निलेश गेले, अशोक सुरावडे अशी ताब्यात असलेल्यांची नावं आहेत.