राज्यातील स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या १९९ वर

गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही स्वाईन फ्लूचा राज्यात परत हाहाकार होण्याची शक्यता आहे. यावर्षी संपूर्ण राज्यात स्वाईन फ्लूमुळे १९९ व्यक्तींचा मृत्यू झालाय. त्यातले ८४ मृत्यू एकट्या पुणे विभागात आहेत तर नागपूर शहर आणि विभाग मिळून या रोगान २५ बळी घेतलेत. याआधी थंडीच्या काळात स्वाईन फ्लूची लागण होत असे पण आता वाढत्या तापमानातही स्वाईन फ्लू होऊ लागल्यामुळे चिंता वाढलीय. 

Updated: May 18, 2017, 08:27 PM IST
राज्यातील स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या १९९ वर title=

अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर : गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही स्वाईन फ्लूचा राज्यात परत हाहाकार होण्याची शक्यता आहे. यावर्षी संपूर्ण राज्यात स्वाईन फ्लूमुळे १९९ व्यक्तींचा मृत्यू झालाय. त्यातले ८४ मृत्यू एकट्या पुणे विभागात आहेत तर नागपूर शहर आणि विभाग मिळून या रोगान २५ बळी घेतलेत. याआधी थंडीच्या काळात स्वाईन फ्लूची लागण होत असे पण आता वाढत्या तापमानातही स्वाईन फ्लू होऊ लागल्यामुळे चिंता वाढलीय. 

दोन वर्षांपूर्वी नागपूरसह संपूर्ण राज्यात स्वाईन फ्लूमुळे दहशतीचं वातावरण होतं. एकट्या नागपुरात स्वाईन फ्लूने ५० मृत्यू झाले होते. तशीच परिस्थिती यावर्षीही उदभवण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत स्वाईन फ्लूने एकट्या नागपुरात २५ बळी घेतलेत. तर संपूर्ण राज्यात १९९ बळी गेलेत. 

दोन वर्षांपूर्वी थंडीमुळे या रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाल्याचा दावा करण्यात आला होता. पण यावर्षी वाढत्या उष्म्यातही स्वाईन फ्लूचा फैलाव झाल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. स्वाईन फ्लूची लक्षण दिसत असल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय.  

२०१० आणि २०११ या दोन वर्षात स्वाईन फ्लूमुळे सुमारे १०० हून अधिक जीव गेले या रोगाची दहशत कमी होत नसल्याने यासंबंधी अधिक संशोधन व्हावं ही मागणी आता सर्वसामान्य नागरिक करत आहे.