18 चाकी ट्रक घेऊन दरोडा

चाळीसगाव रोडवर धुळे शहराजवळ दरोड्याच्या इराद्याने जाणा-या आठ जणांच्या टोळक्याला मोहाडी पोलीसांनी शिताफीने पकडले आहे.

Updated: Apr 2, 2016, 05:15 PM IST
18 चाकी ट्रक घेऊन दरोडा title=

धुळे: चाळीसगाव रोडवर धुळे शहराजवळ दरोड्याच्या इराद्याने जाणा-या आठ जणांच्या टोळक्याला मोहाडी पोलीसांनी शिताफीने पकडले आहे. हे आठजण अकोल्यातील असून चक्क १८ चाकी ट्रक घेऊन  हे संशयित दरोडेखोर जात होते.

त्यांच्याकडून अनेक घातक हत्यार आणि सात लाख २८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मोहाडी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी चाळीसगाव चौफुलीवर एका  हॉटेल जवळ एक ट्रकमध्ये सात ते आठ जण होते त्यांना विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यांच्याकडे ३ रिव्हॉल्व्हर, १२ बोअरचा कट्टा, जिवंत काडतूस, कोयता अशी हत्यारे मिळाली.