पोलीस भरतीमध्ये घोटाळा

पोलीस भरतीमध्ये बोगस उमेदवार उभे करून गडबड करणाऱ्या आठ आरोपींना बीड पोलिसांनी जेरबंद केलंय.

Updated: Apr 2, 2016, 04:56 PM IST
पोलीस भरतीमध्ये घोटाळा title=

बी़ड: पोलीस भरतीमध्ये बोगस उमेदवार उभे करून गडबड करणाऱ्या आठ आरोपींना बीड पोलिसांनी जेरबंद केलंय. या कारवाईमुळे भरतीमध्ये गैरप्रकार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. 
या आठ आरोपींमध्ये प्रमुख आरोपीनं यापूर्वी पुण्यात अशाच पद्धतीनं भरतीमध्ये गडबड करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालाय.

पोलीस भरतीमध्ये उतीर्ण व्हायचं असेल तर चार ते पाच लाख रुपयांचा रेट बीडमध्ये काढण्यात आला होता. कॉम्पुटर इन्स्टिट्युटचा चालक, स्पर्धा परीक्षा देणारा एक उमेदवार आणि एक दलाल यांनी बीडमध्ये भरतीमध्ये घोटाळा करण्याचा प्रयत्न केला.