चाटे कोचिंग क्‍लासेसच्या शिक्षकाकडून १७ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग

येथील चाटे कोचिंग क्‍लासेसच्या जुनियर कॉलेजमध्ये १७ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षक मयुर कुंभार याला पोलिसांनी अटक केली आहे. 

Updated: May 9, 2015, 10:50 AM IST
चाटे कोचिंग क्‍लासेसच्या शिक्षकाकडून १७ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग  title=

सांगली : येथील चाटे कोचिंग क्‍लासेसच्या जुनियर कॉलेजमध्ये १७ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षक मयुर कुंभार याला पोलिसांनी अटक केली आहे. 

अभ्यासाच्या निमित्ताने शिक्षक मयुर कुंभार याने विद्यार्थिनीला क्‍लासच्या वरच्या मजल्यावर बोलवले. ती आल्यानंतर विनयभंग  करण्याचा  प्रयत्न केला. विद्यार्थिनीने आरडाओरड केल्यानंतर कुंभारने  तिला सोडले. या प्रकाराने घाबरलेल्या मुलीने तात्काळ नातेवाइकांना हा प्रकार सांगितला. नातेवाईक गोळा झाल्यानंतर परिसरातील नागरिकही जमले. शिक्षकाने विनयभंग केल्याचे समजताच त्याला पकडून बेदम चोप दिला.

कुंभार विरुद्ध विनयभंग, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाने संतप्त झालेल्या शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी, शिक्षकाला पाठीशी घालणाऱ्या अन्य शिक्षकांच्या श्रीमुखात लगावली. तसेच या शिक्षकांना कान धरून माफीही मागायला लावली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.