छेडछाडीला कंटाळून औरंगाबादेत दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

औरंगाबादमध्ये सप्टेंबरमध्ये श्रुती कुलकर्णी या मुलीनं छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर मंगळवारी परत तशीच घटना घडलीय. ऋतुजा गायके या दहावीतल्या मुलीनं छेडछाडीला वैतागून आपली जीवनयात्रा संपवलीय.

Updated: Nov 18, 2015, 11:28 AM IST
छेडछाडीला कंटाळून औरंगाबादेत दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद: औरंगाबादमध्ये सप्टेंबरमध्ये श्रुती कुलकर्णी या मुलीनं छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर मंगळवारी परत तशीच घटना घडलीय. ऋतुजा गायके या दहावीतल्या मुलीनं छेडछाडीला वैतागून आपली जीवनयात्रा संपवलीय.

दहावीत शिकणाऱ्या ऋतुजानं खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाला सुरुवात करण्याआधीच या जगाचा कायमचा निरोप घेतलाय. सततच्या छेडछाडीला कंटाळून तिनं आपली जीवनयात्रा संपवली. ऋतुजाला तिच्याच गल्लीत राहणारा ईश्वर साळवे त्रास देत होता. दिवाळीच्या सुट्ट्या संपवून मामाच्या घरुन ऋतुजा परतली. पण ईश्वरनं तिला एकटीला गाठलं आणि तिची छेड काढण्यास सुरुवात केली. लग्न करण्यासाठी धमक्याही दिल्या, तसंच घरी सांगितलं तर तुझ्यासह आई-वडिलांना ठार मारण्याची धमकीही दिली. पण ऋतुजानं आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर ऋतुजाच्या आईनं ईश्वरच्या आईशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र ईश्वर आणि त्याच्या आईनंही ऋतुजाच्या कुटुंबीयांना धमकावलं. झालेल्या प्रकारामुळे ऋतुजा पुरती भेदरली आणि त्यातूनचं तिने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. 

आणखी वाचा - चिंचवडमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या

खरं तर झालेला प्रकार मन सुन्न करणारा असून सहा महिन्याआंधी पोलिसांना तोंडी सांगण्याऐवजी गायके कुटुंबीयांनी हिमतीनं पोलिसांत तक्रार केली असती तर कदाचित ही वेळ आली नसती. खरंच आपल्या मुली या समाजात सुरक्षित आहेत का? असा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा उभा राहिलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.