ऑडिट - मुंबई उत्तर (लोकसभा मतदारसंघाचं)

स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणारी मुंबईतली ही गोरेगाव फिल्मसिटी जशी प्रसिद्ध...तशीच मुंबापुरीतल्या राजकारणाची त-हाही काही औरचं.

Updated: Oct 7, 2014, 09:36 PM IST
 title=

मुंबई : स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणारी मुंबईतली ही गोरेगाव फिल्मसिटी जशी प्रसिद्ध...तशीच मुंबापुरीतल्या राजकारणाची त-हाही काही औरचं.

विधानसभेच्या निवडणुकीचं बिगूल वाजलं आणि मुंबापुरीत पुन्हा एकदा राजकारणाचे पडघम वाजू लागलेत. 

भाजप-सेना युती टिकणार का? महायुतीचं काय होणार. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत नेमकं चाललंय काय ? ही सगळी चर्चा सध्या मुंबईकर चवीनं चाखताहेत.

उत्तर मुंबईचा विचार करता इथे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये भाजपकडे दोन, काँग्रेसकडे दोन, मनसे आणि शिवसेनेकडे प्रत्येकी एक आहे. 

तर उत्तर पश्चिम मुंबईचा विचार केल्यास इथल्या सहापैकी चार मतदारसंघांवर काँग्रेसचा झेंडा आहे. तर शिवसेनेच्या ताब्यात दोन मतदारसंघ आहेत.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीचं चित्र पाहिलं असता बोरीवलीमध्ये भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी मनसेच्या नयन कदम यांचा ३०२२७ एवढ्या मताधिक्क्याने पराभव केला होता. आता शेट्टी भाजपचे खासदार म्हणून निवडून आलेत. 

मागाठाणे मध्ये मनसेच्या प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकाश सुर्वे यांचा १२९८५ मताधिक्याने पराभव केला होता.

दहिसरमध्ये शिवसेनेच्या विनोद घोसाळकर यांनी काँग्रेसच्या योगेश दुबेंचा १६१५६ एवढ्या मताधिक्याने पराभव करत विजयश्री मिळवली.

मालाड पश्चिमध्ये काँग्रेसचे अस्लम शेख भाजपच्या आर. यू. सिंग यांचा २७६९५ मताधिक्याने पराभव करत आमदारपदी विराजमान झाले. 

कांदिवली पूर्वमध्ये काँग्रेसचे रमेशसिंग ठाकूर यानी भाजपच्या जयप्रकाश ठाकूर यांचा ११३०६ मताधिक्याने पराभव करत विजयश्री मिळवली. 

तर चारकोपमध्ये भाजपचे योगेश सागर यांनी काँग्रेसच्या भारत पारेख यांचा १६३६३ मताधिक्याने पराभव करत आमदारकी मिळवली होती.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.