मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शक्तिशाली महाराष्ट्रासाठी एक महत्वाची घोषणा करणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना-मनसे यांच्यात युती होणार का? की भाजप सरकारमधून शिवसेना बाहेर पडणार का? की आणखी काही, याची चर्चा सुरु झालेय. त्यामुळे मुंबईत होणाऱ्या सभेकडे लक्ष लागलेय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वृत्तवाहिनी मीडियाशी बोलताना शिवसेना-मनसे युतीबाबत चर्चा झाल्याचं सांगितल होते. त्यामुळे उद्धव ठाकरे नक्की आजच्या जाहीर सभेत काय बोलणार याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. भाजपने शिवसेनेशी काडीमोड घेतल्याने उद्धव अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी भाजपवर सर्वच सभांमधून हल्लाबोल केलाय. तर अफझल खानाच्या फौजाप्रमाणे दिल्लीतून भाजपच्या नेत्यांची फौज महाराष्ट्रात येत आहे. आम्ही महाराष्ट्र संभाळण्यास समर्थ आहोत. तुम्ही दिल्ली संभाळा, असा सल्ला दिला होता. त्यानंतर भाजपने आपली टीम राज्यात प्रचारासाठी आणलेय. त्यामुळे सेना-भाजपमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
भाजपसोबत राज्यातली युती तुटली आहे तरी केंद्रातली युती मात्र कायम आहे. त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेसह अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजपची स्थानिक स्वराज्य संस्थांमधली युतीही कायम आहे. या युतीबाबत उद्धव काही घोषणा करणार का? मनसेला सोबत घेणार का? की केंद्रातून बाहेर पडण्याचा निर्णय उद्धव घेणार का? अशी चर्चा आहे. त्यामुळे याविषयी उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे लक्ष्य लागले आहे. त्यामुळे आजच्या बांद्रा कुर्ला-कॉम्प्लेक्सच्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेनेच्या इंद्रधनुष्य व्हिजन डॉक्युमेंटमधील काही घोषणा होणार का, याकडेही लक्ष्य लागले आहे. उद्धव ठाकरे निवडणू देण्यासाठी मतदारांना सवलतीची घोषणा करतील किंवा मुंबईसाठी नविन धोरण काही असेल का, याचीच चर्चा जोर धरु लागली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.