राज्यात आतापर्यंत सरासरी 31 टक्के मतदान

राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 31 टक्के मतदान झालंय.  मुंबई, पुणे सारख्या महानगरांपेक्षा गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात मतदानाचा प्रचंड उत्साह दिसून येतोय. गेल्यावेळीही मुंबई आणि ठाण्यामध्येच अत्यल्प मतदान झालं होतं. तेव्हा मुंबईकरांनो आणि ठाणेकरांनो, घरात बसून राहू नका... घराबाहेर पडा, मतदान करा... आपला रेकॉर्ड सुधारण्याची हीच संधी आहे..

Updated: Oct 15, 2014, 04:16 PM IST
राज्यात आतापर्यंत सरासरी 31 टक्के मतदान title=

मुंबई : राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 31 टक्के मतदान झालंय.  मुंबई, पुणे सारख्या महानगरांपेक्षा गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात मतदानाचा प्रचंड उत्साह दिसून येतोय. गेल्यावेळीही मुंबई आणि ठाण्यामध्येच अत्यल्प मतदान झालं होतं. तेव्हा मुंबईकरांनो आणि ठाणेकरांनो, घरात बसून राहू नका... घराबाहेर पडा, मतदान करा... आपला रेकॉर्ड सुधारण्याची हीच संधी आहे..

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिकसह राज्यातल्या प्रत्येक भागात सकाळपासूनच मतदानाचा उत्साह दिसून येतोय. राजकीय नेत्यांनींही मतदानाचा हक्क बजावला.... शरद पवारांनी मुंबईमध्ये तर अजित पवार आणि सुळेंनी बारामतीत मतदान केलं. शिंदे कुटुंबीयांनी सोलापुरात तर देशमुख कुटुंबीयांनी लातूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत मतदान केलं. उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसमवेत बांद्रा इथल्या एमआयजी क्लबमध्ये मतदानाचा हक्क बजावला. तर राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह दादर इथल्या बालमोहन विद्यालयात मतदान केलं.

राज्याची जनता प्रादेशिक पक्षांना नव्हे तर राष्ट्रीय पक्षांनाच साथ देईल असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि दक्षिण कराडमधील काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलाय. निवडणुकीनंतर राष्ट्रवादीशी आघाडी करणार का या प्रश्नावर त्यांनी पुढील समीकरणं निकालानंतरच ठरवली जातील असंही त्यांनी म्हटलंय. तसंच राष्ट्रवादीनं माझ्याविरोधात कडवा प्रचार केला नसल्याचंही ते यावेळी म्हणाले. 

तासगाव कवठेमहाकाळमध्ये राष्ट्रवादीचे आर. आर. पाटील विरोधात भाजपचे अजितराव घोरपडे एकमेकांसमोर आहेत... आज त्यांचं राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद होतंय. आर. आर. पाटलांनी अंजनी गावात मतदानाचा हक्क बजावला. तर भाजपचे  उमेदवार अजितराव घोरपडे कंगनोली इथं मतदान केलं. 

राज्याचे  माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या कुटुंबासह बावडा या गावी मतदानाचा अधिकार बजावला काँग्रेस पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करेल  असा विश्वास  हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. सध्या इंदापुरात काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस असा अटीतटीचा सामना आहे.राष्ट्रवादीच्या  उमेदवाराच्या प्रचारासाठी या वेळेस शरद पवार यांनी सभा घेतली नाही. त्यामुळे इंदापुरात सध्या उलट-सुलट चर्चा होत आहे. 

मुंबईच्या प्रथम नागरिक आणि महापौर स्नेलह आंबेकर यांनी मतदानाचा हक्क बजावलाय.. लोअर परेल इथल्या एन.एम. जोशी मार्ग पालिका शाळेत त्यांनी मतदान केलंय.. शिवडी मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार अजय चौधरी आहेत.. याच मतदारसंघात महापौरांनी मतदान केलं.. झी 24 तासनं राबवलेल्या मतदानजागृती उपक्रमाचं कौतुक केलं.. 

* शिवसेना नेते संजय राऊत यांनी भांडूपमध्ये मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ आणि विक्रोळी विधानसभा मतदार संघातून शिवसेनेतर्फे उमेदवारी मिळालेले उमेदवार सुनील राऊतही यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. राज्यात शिवसेनाच सत्तेवर येईल असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय. 

 * रत्नागिरीत शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत यांनी मतदान केलं.. आपलाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
* सावंतवाडीत शिवसेनेचे उमेदवार दिपक केसरकर यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय.. सिंधुदुर्गवासियांचा संघर्ष संपलाय आता विकासाचं पर्व सुरू झालंय असं म्हणत जनता आपल्या पाठिशीच उभी राहील असं केसरकरांनी व्यक्त केलाय.. 

* राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मतदानाचा हक्क बजावलाय.. साता-यात त्यांनी सपत्निक मतदानाचा हक्क बजावलाय.. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे १९ तारखेला समजेल असे मत यावेळी उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलंय.

* काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही आज मतदानाचा हक्क बजावला. यवतमाळमध्ये त्यांनी मतदान केलंय. यावेळी काँग्रेसला बहुमत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

* नागपूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाचा हक्क बजावला. जनता काँग्रेस, राष्ट्रवादीला बाजूला सारत भाजपलाच पूर्ण बहुमतानं विजयी करेल असा विश्वास असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

* नागपूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाचा हक्क बजावला. जनता काँग्रेस, राष्ट्रवादीला बाजूला सारत भाजपलाच पूर्ण बहुमतानं विजयी करेल असा विश्वास असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

मनसे नेते आणि शिवडी मतदारसंघातील उमेदवार बाळा नांदगावकर यांनी मतदानाचा हक्क बजावलाय.. मनसेचे 25 उमेदवार निवडून येतील आणि आमच्या सहभागाशिवाय सरकार बनू शकणार नाही असा विश्वास बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलाय.. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी.. 

विक्रोळीत मनसे कार्यकर्ते आणि शिवसैनिक भिडलेत...पार्कसाईट पोलिंग बुथवर हा प्रकार घडलाय....दोन्ही पक्षातील खडाजंगीमुळे काहीकाळ वातावरण तंग होते... त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय... मात्र मतदान सुरळीत सुरू आहे. 

उद्योगपती अनिल अंबानी यांनीही मतदानाचा हक्क बजावला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंही सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. पत्नी अंजलीसह सचिननं वांद्रेतील सुपारी टँक म्युनिसिपल स्कूलमध्ये जाऊन मतदान केलं.  अभिनेता सलमान खान आणि अभिषेक बच्चन यांनी मतदानाचा हक्क बजावून, सर्वसामान्य जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. आपल्या बिझी शेड्यूलमधून या सेलिब्रेंटींनी मतदान करून जनतेसमोर एक आदर्श ठेवला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.