अहमदनगर: शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर शिवसेनेकडून सातत्यानं भाजपवर टीकास्त्र सोडलं जातंय. त्यात युवासेनेचे अक्षध्य आदित्य ठाकरेही भाजपवर सडकून टीका करत आहेत.
महाराष्ट्र हाती सत्ता देतोय ती तुम्ही नाकारू नका 25 वर्ष असलेली युती तोडू नका अशी भूमिका मांडली असताना, राज्यातील काही भाजपा नेत्यांनी 24 वर्षीय मुलाला चर्चेसाठी पाठवलं असा कांगावा केला. जर 18 वर्षांचे झाल्यावर मतदानाचा अधिकार मिळतो, तो सरकार ठरवतो आणि 21 वर्षाचं झाल्यावर मी लग्न करुन कुटुंब चालवू शकतो तर चर्चेला 24 वर्षांचा तरुण चालत नाही, असं असेल तर तरुणांच्या मतावर निवडून येणाऱ्या पक्षाच्या हाती तुम्ही सत्ता देणार का? असा सवाल युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपाला केलाय.
कोपरगाव इथले शिवसेनेचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ठाकरेंनी भाजपावर सडकून टीका केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.