ऐन दिवाळीत मनसेत 'फटाके'!

ऐन दिवाळीमध्ये राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये फटाके फुटायला सुरूवात झालीय. 

Updated: Oct 21, 2014, 11:40 PM IST
ऐन दिवाळीत मनसेत 'फटाके'! title=

मुंबई : ऐन दिवाळीमध्ये राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये फटाके फुटायला सुरूवात झालीय. 

विधानसभा निवडणुकीतल्या मनसेच्या दारूण पराभवानंतर, नेत्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेत. 'पक्षाची धोरणं चुकीची नव्हती, तर आमदार कामात कमी पडले' असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी माजी आमदारांवर पराभवाचं खापर फोडलंय. 

तर 'लोकांची कामं केली नसतील तर मी माझ्या सरचिटणीसपदाचा राजीनामा देतो' अशी तिखट प्रतिक्रिया माजी आमदार प्रवीण दरेकर यांनी दिलीय. मागोठणेमध्ये मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतची पक्षाची भूमिकाच कळत नव्हती, असंही दरेकरांनी यावेळी म्हटलंय. 

यंदाच्या निवडणुकीत २१९ जागा लढवणाऱ्या मनसेला अवघ्या एका जागेवर विजय मिळाला आहे. तर एकूण मतांपैकी मनसेला अवघी ३ टक्के मतंच मिळवता आली आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.