मुंबई : मुंबईकर, पुणेकर आणि ठाणेकर मतदारांनी 2009 च्या विधानसभा निवडणुकीकडे सपशेल पाठ फिरवली होती. गेल्यावेळी महाराष्ट्रात जिथं सर्वात कमी मतदान झालं, ते पाच मतदारसंघ मुंबई, पुणे आणि ठाण्यातले होते.
दक्षिण मुंबईतल्या कुलाब्यामध्ये फक्त 35.86 टक्के मतदारांनी मतदान केंद्रावर जाण्याचे कष्ट घेतले. पुणे कँटोनमेंटमधल्या लोकांनीही सुट्टीच एन्जॉय केली. तिथं अवघं 35.93 टक्के मतदान झालं.
मुंबादेवी मतदारसंघात 37.2 टक्के, उल्हासनगरमध्ये 37.8 टक्के, तर अंबरनाथमध्ये 38.8 टक्के एवढ्या अत्यल्प मतदानाची नोंद झाली... आता निदान यंदातरी हे डाग पुसून टाका... आपल्या बोटावर मतदानाची शाई लावा आणि सिद्ध करा की, दाग अच्छे होते है...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.