मनसेला जोरदार धक्का, अनेक नेते आणि नगरसेवकांचा राजीनामा

राज ठाकरेंच्या मनसेला चांगलीच खिंडार पडण्याची शक्यता आहे. नाशिकमधील त्यांची सत्ताही आता जाते की राहते, अशी परिस्थिती सध्या निर्माण झालीय. नाशिकचे माजी आमदार अनंत गीते यांनी मनसेच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिलाय.

Updated: Nov 3, 2014, 01:18 PM IST
मनसेला जोरदार धक्का, अनेक नेते आणि नगरसेवकांचा राजीनामा title=

नाशिक: राज ठाकरेंच्या मनसेला चांगलीच खिंडार पडण्याची शक्यता आहे. नाशिकमधील त्यांची सत्ताही आता जाते की राहते, अशी परिस्थिती सध्या निर्माण झालीय. नाशिकचे माजी आमदार अनंत गीते यांनी मनसेच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिलाय.

गीतेंसोबतच अतुल चांडक आणि सचिन ठाकरे यांनीही राजीनामा दिलाय. मनसेचे १८ नगरसेवक आज दुपारी राजीनामा देणार असल्याचं कळतंय. तर मनविसेच्याही बहुतांश पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा दिलाय.

आपल्या राजीनाम्यानंतर वसंत गीते यांनी आपण पक्षाचं काम करत राहणार असं म्हटलं असलं, तरी ते भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. त्यामुळं मनसेचा बालेकिल्ला ढासळण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिका मनसेच्या हाती राहते की जाते हे लवकरच कळण्याची शक्यता आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुलगी उर्वशीच्या अपघातामुळे आपला दौरा रद्द केलाय. कार्यकर्त्यांमध्ये असलेला असंतोष त्यांच्या राजीनाम्याच्या रुपानं पुढं येतांना दिसतोय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.