शहरातील मतदारांचा भाजपला कौल

राज्यातला शहरी मतदार बहुतांश प्रमाणात भाजपाच्या बाजुनं असल्याचं या निकालामधून समोर आलंय.. शहरी भागात मोडणा-या 92 जागांपैकी तब्बल 52 जागा भाजपानं पटकावल्यात... यात मुंबई आणि शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागात भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरला...

Updated: Oct 21, 2014, 05:13 PM IST
शहरातील मतदारांचा भाजपला कौल title=

मुंबई : राज्यातला शहरी मतदार बहुतांश प्रमाणात भाजपाच्या बाजुनं असल्याचं या निकालामधून समोर आलंय.. शहरी भागात मोडणा-या 92 जागांपैकी तब्बल 52 जागा भाजपानं पटकावल्यात... यात मुंबई आणि शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागात भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरला...

पुणे आणि नागपूर शहरांमधल्या सर्वच्या सर्व जागी कमळ फुललंय.... तर नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, अकोला, अमरावती या महापालिका क्षेत्रांमध्येही भाजपानं दमदार कामगिरी केलीये...

2009च्या निवडणुकीत या शहरी भागांमध्ये युतीचाच वरचष्मा राहिला होता... मात्र आता वेगवेगळे लढल्यानंतर शिवसेनेपेक्षा भाजपाच शहरी मतदारांना जवळचा वाटत असल्याचं स्पष्ट झालंय... सुशिक्षित मतदारांमध्ये आलेली जागरूकता आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात भाजपाला आलेलं यश, याचा हा परिणाम समजला जातोय... 

शहरी भागात भाजपा आणि शिवसेनेला मिळालेल्या जागांची तुलना करता, भाजपानं शिवसेनेला धोबीपछाड दिल्याचंच दिसतंय...

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.