अमळनेर येथे ६२ तर सांगलीत ५ लाखांची रोकड जप्त

अमळनेरमध्ये विप्रो रस्ता येथे ६२ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पाटील प्लाझामध्ये तीन बॅगांमध्ये ही रक्कम सापडली. जगदीश मधुकर चौधरी (रा.नंदुरबार) योगेश भिका चौधरी( रा.नंदुरबार) यांच्याकडील  रोकड निवडणूक अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. आज सकाळी सांगलीत ५ लाखांची रोकड सापडली.

Updated: Oct 11, 2014, 09:45 AM IST
अमळनेर येथे ६२ तर सांगलीत ५ लाखांची रोकड जप्त  title=

 अमळनेर / सांगली : अमळनेरमध्ये विप्रो रस्ता येथे ६२ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पाटील प्लाझामध्ये तीन बॅगांमध्ये ही रक्कम सापडली. जगदीश मधुकर चौधरी (रा.नंदुरबार) योगेश भिका चौधरी( रा.नंदुरबार) यांच्याकडील  रोकड निवडणूक अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. आज सकाळी सांगलीत ५ लाखांची रोकड सापडली.

निवडणूक भरारी पथकानं कारवाईत करत नंदुरबारच्या दोन जणांना ताब्यात घेतलंय. ही रोकड कुठून आली याबाबत दोघेही जण कागदपत्र दाखवू शकले नाहीत. अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, आज सांगलीतील विटामध्ये ५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. एका कारमध्ये ही रोकड सापडली. याबाबत मिथून सगरे यांची कार असून याप्रकरणी आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवलीमध्ये निवडणूक भरारी पथकानं ४० लाखांची रोकड जप्त केलीय. एका फॉर्च्युनर गाडीमध्ये ही रक्कम सापडली. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी सुरु असताना फॉर्च्युनर गाडी अडवून झडती घेतली असता भरारी पथकाला ही रोकड सापडली. 

मनोज राय नावाचा व्यक्ती ही गाडी चालवत होता. आपण बिल्डर असून ही रोकड स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी घेऊन जात असल्याचं यावेळी त्या व्यक्तीनं पोलिसांना सांगितलं.
 
निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या प्रत्येक भागात लक्ष्मीदर्शन सुरूच आहे. माटुंग्य़ाच्या अरोरा सिनेमागृहात पाण्य़ाच्या टाकीतून दहा हजार रूपये आणि निवडणूक मतदार यादी जप्त करण्यात आलीय. तर बोरिवलीत पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा पन्नास लाख रूपय़े जप्त केलेत. तर दुपारच्या सुमारास डोंबिवलीत ४० लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.