तरूणांचे लैंगिक संबंधाबाबत विचार बदलतायेत....

लैंगिक जीवन हा सामान्य जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मानवासहित सर्व प्राण्यांमध्ये लैंगिक व्यवहाराची प्रबळ प्रेरणा आहे.

Updated: Jun 1, 2013, 08:20 AM IST

www.24taas.com
लैंगिक जीवन हा सामान्य जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मानवासहित सर्व प्राण्यांमध्ये लैंगिक व्यवहाराची प्रबळ प्रेरणा आहे. पण मानवतेतर प्राण्यांमध्ये असते, तशी मानवामध्ये ह्या प्रेरणेचे नियमन करण्याची काही नैसर्गिक यंत्रणा नाही.
मानवामध्ये ह्या प्रेरणेचे कार्य व आविष्कार प्राण्यांप्रमाणेच पुनरुत्पादनापुरताच मर्यादित असता, तर विवाह ही संस्थाच अस्तित्वात आली नसती. अलीकडच्या काळात सामाजिक दृष्टिकोनातून `सेक्स’च्या नियमांमध्ये खूप बदल झाला आहे.
`टॅबू ‘नावाचा प्रकार आता उरलेला नाही. `सेक्स’बाबत असलेले आचार-विचार खूप लिबरल झाले आहेत. सेक्ससाठी लग्नापर्यंत थांबणे ही भूतकाळातील गोष्ट बनली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.