लैंगिक जीवनातील सुखही तेवढचं महत्त्वाचं

सेक्स या विषयाकडे फार प्रतिगामी दृष्टिकोनातून पाहत असे. कॅथॉलिक पंथीय सेक्सला फार वाईट समजत असत, अजूनही तो पगडा कायम आहे.

Updated: May 4, 2013, 08:24 AM IST

www.24taas.com
सेक्स या विषयाकडे फार प्रतिगामी दृष्टिकोनातून पाहत असे. कॅथॉलिक पंथीय सेक्सला फार वाईट समजत असत, अजूनही तो पगडा कायम आहे. पती-पत्नींनीसुद्धा रतिक्रीडेपासून दूर राहिलं पाहिजे. अपवाद फक्त अपत्यप्राप्ती उद्देशाचा. तेवढय़ापुरतंच पतिपत्नींनी एकत्र यावं. बाकी सेक्स म्हणजे पापाची खाण. त्या काळातील इंग्लंडवर या विचारधारेचा पगडा होता.
सुशिक्षितांच्या माध्यमातून तो भारतीय संस्कृतीचा विचार ठरू पाहतोय. मधल्या काळात इंग्लंड खूप बदललं, पण भारतीय सुशिक्षितांची मानसिकता मात्र तशीच प्रतिगामीच राहिली. भारतीयांनी रतिक्रीडेला, कामाला पुरुषार्थ मानला आहे. हा अभ्यासाचा, जीवनात आनंद घेण्याचा विषय मानला आहे. म्हणूनच जगातलं पहिलं सेक्स एज्युकेशनवरचं पुस्तक लिहिणारा `कामसूत्र` जनक वात्सायन ऋषी हा प्रतिष्ठित ऋषी होता. त्याचं नाव नेहमीच आदरानं घेतलं जातं.

आकर्षणामुळं एकत्र आलेल्या स्त्री-पुरुषांना रतिक्रीडा करावीशी वाटावी, त्यात त्यांना प्रचंड आनंद मिळावा. या आनंदासाठी त्यांनी वारंवार एकत्र यावं अशी रचनाच निसर्गानं निर्माण केली आहे. म्हणूनच आजही मानवी जीवनातील सर्वोच्च व परमोच्च आनंद स्त्री-पुरुष संबंधातील `ऑरगॅझम`मधून रतिक्रीडेतील `लैंगिक तृप्तीतून` मिळतो.