www.24taas.com
सेक्स संदर्भात अनेक ठिकाणी चुकीचे समज आणि माहिती उपलब्ध आहे. सेक्स संदर्भात तुमच्या मनात काही शंका असतील, त्या शंका दूर करण्यात आपण घाबरत असाल तर आता घाबरण्याचे काम नाही.
साइज मैटर्स
बड़ा है तो बेहतर है. क्या तुम्हांलाही वाटते की सेक्शुअल प्लेझर प्रायव्हेट ऑर्गनच्या साईजवर अवलंबून असते. असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. संभोग आणि ऑर्गेझमसाठी योनीच्या नलिकेची सुरूवातीचे चार सेंटीमीटरच गरजेचे असतात. म्हणजे योनीचा (१/३) भाग. नंतरच्या भागात म्हणजे २/३ भागात स्टिम्युलेशन करून आपण वेळ वाया घालविण्याचा काय फायदा. या ठिकाणाहून तुम्हांला रिस्पॉन्सचं येत नाही.
लव फूडमुळे सेक्स लाइफ स्पाइसी
तुम्ही तुमचे सेक्स लाइफ बुस्ट करण्यासाठी ओएस्टर आणि स्ट्रॉबेरी सारखे अन्न खातात. तर तुमचा हा फार मोठा गैरसमज आहे. सेक्शुअल प्लेझरचा या सर्वांशी काहीच संबंध नाही. चॉकलेट हे सेक्शुअल स्टिम्युलेटिंग फूट आहे, परंतु यामुळे तुमची सेक्स पावर वाढते हा चुकीचा समज आहे.
पुरूष महिलांपेक्षा अधिक सेक्स बाबतीत विचार करतात
महिलांनो, सेक्स गेमसाठी पुरूषांना दोषी नका ठरवू. सेक्स बाबतीत पुरूषांइतकंच महिलाही विचार करतात. १८ व्या वर्षी मुलींच्या हार्मोन्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होतात. त्यावेळी सेक्स संदर्भात विचार वाढतो. झोपताना काही खाताना सेक्स संदर्भातील विचार येण्याचा चान्स अधिक आहे. प्रत्येकाच्या जीवनात असा एक वय असते, की ज्यावेळी महिला असो वा पुरूष दोघांना सेक्सच्या इच्छा मदमस्त करून टाकते. नेहमीच पुरूष सेक्सच्या बाबतीत पुढाकार घेतात, असे नाही तर हे महिलांकडूनही पुढाकार घेतला जातो.
विड्रॉल मेथर्ड = नो प्रेग्नन्सी
गर्भधारणेसाठी एकच शुक्रांणू पुरेसा असतो. संभोगाच्यावेळी डिस्चार्ज होताना विड्रॉल मेथर्ड वापरल्याने गर्भधारणेची शक्यता कमी असते, असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. काही वेळा प्री-इंजक्युलेशनच्या वेळीच शुक्राणू ट्रान्सफर होऊन जातो. त्यावेळी तुम्ही विड्रॉल केले तरी गर्भधारणेची शक्यता असते. या मेथर्डला प्रेग्नन्सी टाळण्यासाठी फूल प्रुफ प्लान नका मानू.
महिलांनाही पॉर्न आवडीने पाहतात
काही महिलांना आपल्या पलंगावर गुलाबाच्या पाकळ्या आवडतात, तर काहींना नाही. काही महिलांना पोर्न फिल्म पाहणे आवडत नाही, तर काही महिला लव मेकिंगसाठी पुरूषांप्रमाणेच सेक्शुअल फॅन्टसी निर्माण करतात. तर त्यावेळी त्या आवडीने पॉर्न फिल्म पाहतात.
पिरिअडमध्ये सेक्स = नो प्रेग्नन्सी
पिरिअड असताना तुम्ही सेक्स केला तर प्रेग्नन्ट होण्याचे चॉन्स नसतो, असा विचार तुम्ही करत असाल तर तो चुकीचा आहे. हे खरे आहे की या दरम्यान गर्भधारणेची शक्यता कमी असते. पण अशक्य असे काहीही नाही. शुक्रांणू बराच काळ महिलेच्या शरिरात राहू शकतो.