युवीची जोरदार 'डेटिंग'... पण आता कुणासोबत? पाहा...

'आ आन्टे आमलापुरम...' गाणं आठवतंय... या गाण्याच्या ठेक्यावर आपल्यासोबतच इतरांनाही ठुमके लावायला लावणारी हेझल किच कदाचित तुमच्या लवकर लक्षात येणार नाही... पण, हीच हेझल आता पुन्हा एकदा चर्चेत आलीय.

Updated: Sep 5, 2015, 09:09 AM IST
युवीची जोरदार 'डेटिंग'... पण आता कुणासोबत? पाहा...  title=
सौ. द एशियन एज

मुंबई : 'आ आन्टे आमलापुरम...' गाणं आठवतंय... या गाण्याच्या ठेक्यावर आपल्यासोबतच इतरांनाही ठुमके लावायला लावणारी हेझल किच कदाचित तुमच्या लवकर लक्षात येणार नाही... पण, हीच हेझल आता पुन्हा एकदा चर्चेत आलीय.

बॉलिवूडमधून एकदम गायब झालेली हेझल सध्या चर्चेत आहे ती तिच्या अभिनयासाठी नव्हे तर तिच्या क्रिकेटर युवराज सिंग याच्यासोबतच्या संबंधांमुळे... 


हेझल किच

नुकतीच हेझल विमानतळावर कॅमेऱ्यासमोर दिसली... पण, यावेळी ती एकटी नव्हती तर तिच्यासोबत युवीही होता... दोघंही आपल्या चेहऱ्यावर काहीही हावभाव न दाखवता आपापल्या दिशेकडे वळले.

पण, चर्चा मात्र अशी आहे की हेझल आणि युवी लंडनला फिरण्यासाठी एकत्र गेले होते. 

उल्लेखनीय म्हणजे,  हेझल ही लंडनमध्ये जन्मलेली अभिनेत्री बिग बॉस सीझन ७ मध्ये दिसण्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय. 

हेच ते गाणं... ज्यामुळे हेझल चर्चेत आली होती...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.