मुंबई : पुढच्या आठवड्यात रिलीज होणाऱ्या सलमान खानच्या 'सुल्तान' या चित्रपटाआधी आज तो महिला आयोगासमोर हजर होणार आहे.
'सुल्तान'च्या शुटिंगहून आल्यावर बलात्कार झालेल्या महिलेइतकाच थकून जात असे, या वक्तव्यामुळे सलमान खान अडचणीत आला आहे. या विधानानंतर देशभरातल्या महिला संघटनांनी सलमानवर टीकेची झोड उठवली होती.
राज्य महिला आयोगानंही सलमानच्या या विधानावर तीव्र आक्षेप घेतला. सलमानचे वडील सलीम खान यांनी सलमानच्या वतीने दिलगिरी व्यक्त करून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्याआधीच महिला आयोगाने सलमानच्या असंवेदनशील वक्तव्याविषयी त्याला नोटीस धाडली होती. या नोटीसीवर उत्तर देण्यासाठी आज सलमान खान महिला आयोगाच्या कार्यालयात जाणार आहे.